परदेशातील सर्वात मोठा विजय! टेस्टमधील टीम इंडियाचा बेस्ट रेकॉर्ड
बर्मिंगहॅमच्या मैदानात रचला नवा इतिहास
शुबममन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने बर्मिंगहॅमच्या मैदानातील विजयासह नवा इतिहास रचला आहे.
इथं एक नजर टाकुयात भारतीय संघाने सर्वाधिक धावांसह जिंकलेल्या पाच कसोटी सामन्यांतील खास रेकॉर्ड्सवर
भारतीय संघाने २०२४ मध्ये इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानात ४३४ धावांनी विजय नोंदवल्याचा रेकॉर्ड आहे. धावांच्या दष्टीने टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे.
२०२१ मध्ये भारतीय संघाने मुंबईच्या वानखेडेच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीत ३७२ धावांनी विजय मिळवला होता.
टीम इंडियाने कसोटीतील तिसरा मोठा विजय हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २०१५ मध्ये नोंदवला होता. हा सामना भारतीय संघाने ३३७ धावांनी जिंकला होता.
बर्मिंगहॅमच्या मैदानात भारतीय संघाने ३३६ धावांसह परदेशातील सर्वात मोठ्या कसोटी विजयाची नोंद केली आहे.
याआधी २०१९ मध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिज विरुद्धच्या संघाला त्यांच्या घरच्या मैदानात ३१८ धावांनी पराभूत करून दाखवले होते.
२०१६ मध्ये भारतीय संघाने न्यूझीलंडच्या संघाला घरच्या मैदानात ३२१ धावांनी मात दिली होती.