लहान वयातच मुलांना अनेक स्पर्धा, प्रसंगाना सामाेरे जावे लागते. त्यांचा काॅन्फिडन्स वाढवण्यासाठी या खास ८ टिप्स.
काेणाशीही बाेलताना त्यांच्या डाेळ्यात बघून, आत्मविश्वासाने माेठ्या आवाजात बाेलायला शिकवा.
मुलांना नाही म्हणायला शिकवा. शाळेतदेखील न पटणारी गाेष्ट करायला नकार द्यायला शिकवा.
मित्र तुमच्याविषयी नकरात्मक बाेलत असतील, तर त्याला विराेध करा. मुलांना स्वतःसाठी उभे राहायला शिकवा.
मुलांना काहीही चुकीचे वाटले, तर आधी पालकांना सांगायला सांगा. मुलांना पालकांचा आधार वाटला पाहिजे.
चुकीच्या गाेष्टी आजूबाजूला घडत असतील, तर त्यावेळी मुलांना विराेध करायला शिकवा.
साेशलायझेशनला घाबरू नका. मित्र- मैत्रिणींच्या मैत्रीबाबत जास्त काळजी करू नका.
मुलाविषयी शिक्षकांचे मत काय आहे? याचा जास्त प्रभाव मुलांवर पडू देऊ नका.
काेणत्याही परिस्थितीत मुलांचा आत्मविश्वास कमी हाेणार नाही, अशी मुलांना शिकवण द्या.