लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून मुलांकडून पुढे दिलेली प्रार्थना रोज म्हणवून घ्या, त्याचा लाभच होईल.
हिंदू धर्मात अनेक देवी देवता आहेत आणि त्यांचे प्रत्येकाचे स्वतंत्र अस्तित्त्व आहे, पण मुलांना ते कळावे आणि लक्षात राहावे यासाठी ही प्रार्थना..
जेणेकरून मुलांना मुख्य देव लक्षात राहतील आणि त्यांच्याकडे काय मागावे हा संस्कारही लहान वयात करता येईल.
गणपती बुद्धी देकारण ती बुद्धीची देवता आहे!
मारुती शक्ती दे कारण ती शक्तीची देवता आहे!
विठोबा भक्ती दे कारण ती भक्तीची देवता आहे!
नारदा युक्ती दे कारण ती युक्तीची देवता आहे!
सूर्या प्रकाश दे कारण ती प्रकाशाची देवता आहे!
सरस्वती विद्या दे कारण ती विद्येची देवता आहे!
लक्ष्मी संपत्ती दे कारण ती धनधान्य देणारी देवता आहे!
हे रामराया सगळ्यांचं रक्षण कर आणि सुखी ठेव. कारण तोच सर्वांचा पालनकर्ता आहे!
मुलांबरोबर आपणही रोज ही प्रार्थना करायला काहीच हरकत नाही, बरोबर ना?