जगभरात चहाला दाेन नावं कशी मिळाली?

गरमागरम चहाला सहसा काेणी नाही म्हणत नाही. कटिंग, अमृततुल्य ही विशेषण सहज रूळली आहेत. पण, या चहाचा प्रवास तुम्हाला माहिती आहे का?

भारतामध्ये चहा आपलासा झाला असला तरी त्याचे मूळ मात्र चीनमध्ये आहे. चीनमधून जगभरात त्याचा प्रवास सुरू झाला. 

चीनमध्ये चहाला २ नावं आहेत. Cha (चा) आणि Te (ते) या नावाने चहाच्या वनस्पतीला संबाेधले जाते. 

चीनच्या फुजियान प्रांतातून समुद्र मार्गाने चहा युराेपात गेला. त्या व्यापाऱ्यांकडून Te शब्द गेला त्यामुळे Tea हा शब्द प्रचलित झाला. 

भारतात चहा हा जमिनी मार्गाने आला. तसाच तुर्कस्तान, रशियातही गेला. या ठिकाणी Cha पासून Chai किंवा चहा हा शब्द प्रचलित झाला. 

रशियात अजूनही चहाला Chai  असेच म्हटले जाते. चीनमध्ये लागवड झालेली वनस्पती जगभरात दाेन वेगळ्या नावाने पाेहचली आहे. 

भारत, पाकिस्तान आणि नेपाळ मध्येही चहा किंवा चाय हेच नावं अजूनही माेठ्या प्रमाणात वापरले जाते. 

ब्रिटीशांनी पहिल्यांदा भारतात चहाची लागवड केली. त्यांच्याकडे चहाला Tea म्हणतात. पण, हा शब्द भारतीय भाषांमध्ये रूजला नाही. 

चहा आता हे फक्त एक पेय राहिले नाही. आता ही देशाेदेशीच्या खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य घटक बनला आहे. 

Click Here