चहाबाजांनो कंट्रोल! हे आजार ओढवून घ्याल

चहा पाहिजेच, दिवसातून कितीही कप चहा चालताे, ही वाक्य सर्रास ऐकायला मिळतात. पण, तुम्ही असं करताय का? सावधान! 

दिवसभरात चहाचे सेवन जास्त प्रमाणात करत असाल, तर तुम्हाला ही आजारांचा माेठा धाेका आहे. वेळीच सावध व्हा. 

आपल्या देशात अनेकजण चहाप्रेमी आहेत. पण, जास्त प्रमाणात चहा प्यायल्यास शरीराला काय नुकसान हाेऊ शकते ते पाहू या. 

चहामध्ये कॅफिन नावाचा पदार्थ असताे. याचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या चिंता वाढवू शकताे. तुमच्या शरीरावर ताण वाढताे. 

चहाच्या अतिसेवनामुळे तुम्हाला झाेप न लागण्याचा त्रास वाढू शकताे. चहा प्यायल्याने झाेप लागत नाही, याचा परिणाम तुमच्या आराेग्यावर हाेताे. 

दिवसभरात जास्त वेळा चहा प्यायला तर पचनासंबंधीच्या समस्या वाढू शकतात. पचन प्रक्रियेवर चहामुळे परिणाम हाेऊ शकताे. 

चहामध्ये टॅनिन नावाचा पदार्थ असताे. टॅनिनच्या अतिसेवनामुळे त्याचा परिणाम तुमच्या दातांवर हाेऊ शकताे. 

तुमचे आराेग्य चांगले राहण्यासाठी आजच चहा कमी करा. दिवसातून एक किंवा दाेन वेळाच चहा घ्या. त्यापेक्षा अधिक वेळा चहा घेणे टाळा.

Click Here