१२ हजार नोकऱ्या जाणार; वृत्तानंतर TCS च्या शेअरमध्ये भूकंप

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यावर्षी कंपनीतून १२ हजार २६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. 

भारत आणि जगातील दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) यावर्षी कंपनीतून १२ हजार २६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार आहे. 

कंपनीच्या या निर्णयामुळे मध्यमस्तरील आणि उच्चस्तरीय कर्मचाऱ्यांना फटका बसेल. ३० जून २०२५ पर्यंत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६ लाख १३ हजार इतकी होती.

या वृत्तानंतर बीएसईवर टीसीएसचे शेअर्स ३,०८१.२० च्या नीचांकी पातळीवर घसरले. यात १.६९% ची घसरण झाली. या बातमीने संपूर्ण आयटी क्षेत्राला हादरवून टाकलंय.

तर दुसरीकडे इन्फोसिस आणि विप्रोचे शेअर्सही १% पेक्षा जास्त घसरले, ज्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांक १.६% ने घसरला. 

टीसीएसचे सीईओ के कृष्णवासन यांनी कर्मचाऱ्यांची कपात कमी कामामुळे झाली नाही तर कौशल्यांमध्ये तफावत आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात येणाऱ्या आव्हानांमुळे झाल्याचं म्हटलं.

यापूर्वी, टीसीएसनं त्यांची बेंच पॉलिसी बदलली होती. आता कर्मचाऱ्यांना एका वर्षात किमान २२५ बिलेबल दिवस पूर्ण करावे लागतील आणि बेंचवर घालवलेला वेळ ३५ दिवसांपेक्षा कमी असावा.

(टीप - हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू

Click Here