मुलांशी बाेलताना आई - बाबा अनेकदा नकारात्मक वाक्यांचा वापर करतात. ही वाक्यं टाळून वेगळ्या पद्धतीने बाेलल्यास मुलांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम हाेत नाही.
'तुला हे समजत नाही', 'तुला हे कळत नाहीये' अशा प्रकारच्या वाक्यांमुळे मुलांचा काॅन्फिडन्स कमी हाेताे. मुलांमध्ये नकारात्मक भावना निर्माण हाेते.
'तू अजून वेगळा विचार कर', 'हे वेगळ्या पद्धतीनेपण करता येईल ना' अशा वाक्यांमुळे मुलांचा विश्वास वाढताे. मुलं विचार करायला प्रवृत्त हाेतात.
स्वतःच्या मुलांची दुसऱ्यांच्या मुलांबराेबर तुलना करणे टाळले पाहिजे. स्वतःच्या दाेन मुलांमध्येही तुलना करू नका.
मुलांना एखादी गाेष्ट करण्यास नकार द्यायचा असल्यास नाही, नकाे या नकारात्मक शब्दांपासून वाक्य सुरु करू नका.
मुलांशी बाेलताना प्रत्येकवेळा अधिकार वाणीने बाेलणे टाळा. मुलांची मतेही काहीवेळा ऐका आणि विचारात घ्या.
मुलं एखाद्या विषयावर तुमच्याशी बाेलत असतील तर आधी त्यांचे सगळे म्हणणे ऐकून घ्या. त्यावर प्रतिक्रिया द्यायची घाई करू नका.
तुला हे जमणार नाही, असं थेट न म्हणता. हे करून दाखवण्यासाठी तुला अजून प्रॅक्टिस करावी लागेल, असं म्हणा.
आई - बाबाच्या बाेलण्याचा खाेल परिणाम मुलांच्या मनावर हाेत असताे. मुलांच्या निकाेप वाढीसाठी त्यांच्याशी सकारात्मक संवाद साधा.