मुलांशी 'असा' साधा संवाद, नक्की ऐकतील

संवाद म्हणजे विचार, माहितीची देवाण - घेवाण.  सूचना देणे किंवा सल्ला देणे म्हणजे संवाद नाही, हे पालकांनी लक्षात घ्यायला हवे. 

मोबाईलमुळे चॅटिंग वाढलं आहे, पण संवाद कमी झाला आहे. समोरासमोर बसून तासंतास गप्पा मारणे, कमी झाले आहे.

मुलं बोलायला शिकत तेव्हापासून पालकांनी मुलांशी गप्पा मारल्या पाहिजेत. लहान वयापासून मुलांना संवाद साधण्याची सवय लागते. 

तू हे कर, असं नकाे करू, इथे जायचं आहे इतकंच बाेलणं म्हणजे हा संवाद नाही. 

मुलांना अवांतर माहिती देणे, मुलांचे बाेलणं ऐकून घेणे, चर्चा करणे यातून संवाद वाढत जाताे. 

आनंद, दुःख, राग याविषयी मुलांशी बाेललं पाहिजे. मुलांना समजून घेतलं पाहिजे, यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. 

आज दिवसभरात पालकांनी काय केलं, त्यांना कसं वाटतं आहे, हे देखील मुलांना सांगणं गरजेचं आहे. 

मुलांना कंटाळा आला असेल, तर चल, आपण गप्पा मारू असे पालकांनी म्हटले पाहिजे. 

मुलांशी बाेलताना प्रत्येकवेळा अधिकार गाजवून बाेलण्याची गरज नाही. सामान्यपणे बाेला. 

संवादातून मुलांशी असलेले नाते दृढ हाेण्यास मदत हाेते, मुलांना भावनिक स्थिरता मिळते. 

Click Here