डाेळे काेरडे होतात 'ही' घ्या खबरदारी 

दिवसभर लॅपटाॅप नाहीतर माेबाईलच्या वापरामुळे डाेळे काेरडे हाेणे, जळजळ हाेणे  हे त्रास काॅमन झाले आहे. 'अशी' काळजी घेऊन डाेळ्यांचे आराेग्य सुधारा. 

दिवसभर लॅपटाॅपसमाेर बसून काम करताना थाेड्यावेळाने स्क्रीनकडे न पाहता, दुसरीकडे पाहून डाेळ्यांची उघडझाप करण्याची सवय स्वतःला लावून घ्या. 

स्क्रीनकडे सतत पाहिल्याने डाेळ्यातील पाणी सुकते. यामुळे डाेळे काेरडे हाेतात. डाेळ्यात काहीतरी गेले आहे, असे वाटते. डाेळे जळजळतात. 

सलग २० मिनिटे स्क्रीन पाहिल्यावर २० सेकंदासाठी लांबच्या गाेष्टीकडे पहा. आजूबाजूला झाडं असतील तर त्याकडे पहा.

स्क्रीनटाइममुळे डाेळ्यांवर जास्त ताण येत असेल, कर रात्री झाेपण्याआधी डाेळ्यावर थंड पाण्याच्या किंवा दुधाच्या पट्ट्या ठेवा. 

तुम्ही दिवसभर हायड्रेट राहिल्यास, तुमच्या डाेळ्यांचा त्रास कमी हाेण्यास मदत हाेईल. काम करत असताना थाेड्या - थाेड्या वेळाने पाणी पित रहा. 

 डाेळ्यावर ताण येत आहे, असे वाटल्यास, डाेळे बंद करून २ मिनिटं शांत बसावे. डाेळ्यांवरचा ताण कमी हाेण्यास मदत हाेते. डाेळ्यांचे स्नायू रिलॅक्स हाेतात. 

डाेळ्यांचे आराेग्य चांगले राहण्यासाठी राेज किमान ७ तास शांत झाेप घेणे गरजेचे आहे. 

डाेळे काेरडे झाल्यास चाेळू नका, यामुळे डाेळ्यांचा त्रास वाढताे. डाेळ्यावर पाणी मारा यामुळे डाेळ्यांना फ्रेश वाटेल.

Click Here