'हँड फूट माऊथ' डिसीज हा एक संसर्गजन्य आजार आहे. ५ वर्षांखालील मुलांना संसर्गाचा धोका अधिक असतो. त्यामुळे घ्या पुढील काळजी!
हात, गुडघे, पायावर पुरळ येणे, तोंड येणे, ताप येणे ही HFMD ची सामान्य लक्षणे आहेत.
तोंड आणि घशात फोड आल्याने मुलांना खायला, गिळायला खूप त्रास होतो.
HFMD ची लक्षणे साधारणतः ७ ते १० दिवस राहतात. यानंतरही १ आठवडभर दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ शकतो.
५ वर्षांखालील मुलांना शाळा, डे केअरमधून संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. मोठ्या मुलांना, माणसांना ही संसर्ग होऊ शकतो.
संसर्ग टाळण्यासाठी हात स्वच्छ धुणे, चेहऱ्याला हात न लावणे. शिंकताना, खोकताना तोंडावर हात ठेवणे.
लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने १० वर्षांपर्यंतच्या मुलांना याची लागण होऊ शकते.
या आजारावर औषध नाही. लक्षणांवरून औषधे दिली जातात. सामान्यतः ७ ते १० दिवसात आजार बरा होतो.
पाणी, पातळ पदार्थ जास्त प्रमाणात मुलांना खायला द्यावेत. आराम करणे हे यावरील उपाय आहेत.