डोक्यातील विचार अचानक गायब होण्याचे मुख्य कारण. पाहा नक्की काय होते.
अचानक काहीतरी विसरायला होतं? अगदी ओठावर आहे पण आठवत नाही. यालाच ब्रेन फॉग असं म्हणतात. तसं सामान्यच असतं. पण काही लक्षणं वाढत गेली तर त्रासाचे ठरते.
एखादं साधंच काम जे तुम्ही आधीही केलं आहे ते करणं जरा कठीण जातं. काय करावं सुचतच नाही आणि डोकं बधीर होतं.
जागेचं नाव विसरणं, जवळच्या व्यक्तीचं नाव विसरणं काही मिनिटापूर्वीचा संवाद न आठवणं यालाही ब्रेन फॉगच म्हणतात.
अगदी साधी गोष्ट समजायलाही जरा वेळ लागतो. पटकन संकल्पना लक्षात येत नाही. माहिती लक्षात ठेवणं जड जातं.
झोप झाली, पोट भरलंय काहीही शारीरिक ताण नाही तरी थकवा जाणवतो. काही करावसं वाटत नाही. हे ही एक महत्त्वाचं लक्षण आहे.
सतत मन विचलित राहतं. गोंधळ उडालेला असतो. नक्की काय करु हे का ते असे प्रश्न मनात येत राहतात.
शब्दांचा उच्चार चुकतो. रोजच्या वापराचे शब्द बोलताना जीभ वळायला लागते. पटकन काही आठवत नाही.