दिवाळीत सगळेच जण घर स्वच्छ करायच्या मोहिमेवर असतात. अगदी किचनपासून ते बेडरुमपर्यंत प्रत्येक गोष्टीची छान सफाई केली जाते. परंतु, यात मागे राहून जातात ते लाईटचे स्वीच बोर्ड.
अनेकदा कितीही प्रयत्न केला तरी स्वीच बोर्डचा काळेपणा काही केल्या दूर होत नाही.
आपल्या घरातील किरकोळ साहित्य वापरून हे स्वीच बोर्ड कसे स्वच्छ करायचे हे पाहुयात.
स्वीच बोर्ड स्वच्छ करायचा बेस्ट पर्याय म्हणजे नेलपेंट रिमूव्हर. कापसाच्या बोळ्यावर नेलपेंट रिमूव्हर घ्या आणि त्याने बटण स्वच्छ करा.पटकन बटण स्वच्छ होतात.
टुथपेस्ट एका कापडावर घेऊन त्याने बोर्डवर घासा. अवघ्या काही मिनिटात बोर्ड स्वच्छ होईल.
इलेक्ट्रिक स्वीचबोर्डवरील डाग खूप जुने आणि गडद असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिक्स करुन त्याने बटण स्वच्छ करा.
दिवाळीत खरेदी केलेले कपडे वर्षभर राहतील नवीनकोरे, ट्राय करा या टिप्स