यकृताचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठीचे ५ गुणकारी फळं

यकृत निरोगी ठेवण्यासाठी काही फळं अत्यंत गुणकारी आहेत. 

यकृत म्हणजेच लिव्हर हा शरीराचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. या एका अवयवामुळे शरीरातील अनेक कार्य पार पडत असतात.

अनेकदा आपल्या चुकीच्या जीवनशैलीमुळे यकृताचं आरोग्य बिघडतं आणि त्याचे परिणाम संपूर्ण शरीराला भोगावे लागतात.

यकृत निरोगी ठेवण्यासाठी काही फळं अत्यंत गुणकारी आहेत. या फळांविषय़ी जाणून घेऊयात.

पपई यकृतासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यकृताला सूज आली असेल तर पपईमुळे ही सूज कमी होण्यास मदत मिळते.

द्राक्षांमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट यकृताच्या पेशी निरोगी ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे यकृतातील सूज रोखण्यास मदत होते.

अंजीरमध्ये असलेले काही तंतू यकृताचे नुकसान टाळण्यास मदत करतात. यासोबतच फॅटी लिव्हरच्या समस्येपासून संरक्षण करण्यासाठी देखील काम करतात.

सफरचंदाच्या सेवनामुळे यकृताचं डिटॉक्स करण्यास मदत मिळते. 

केळी यकृत मजबूत करण्याचे काम करते. तसेच फॅटी लिव्हरची समस्या कमी होण्यास मदत होते. 

कँल्शियम वाढण्यासाठी घरगुती उपाय 

Click Here