कांदा हा अनेक शारीरिक तक्रारींवर गुणकारी आहे.
प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात कांद्याचा आवर्जुन वापर केला जातो.
कांदा हा अनेक शारीरिक तक्रारींवर गुणकारी असून त्याचे फायदे काय ते पाहुयात.
कांद्याचं सेवन केल्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. तसंच पचनसंस्थादेखील मजबूत होते.
कांद्यामध्ये अँटी कॅन्सर गुण असतात. ज्यामुळे शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत मिळते.
ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी कच्च्या कांद्याचं सेवन करावं. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
कांद्याला लोह, फोलेट आणि पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. कांदा खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता दूर केली जाऊ शकते.