व्हिटॅमिन 'डी' शरीरात याेग्य प्रमाणात असल्यास त्याचा शरीराला फायद हाेताे. या ३ तासांत तुम्हाला सर्वाधिक व्हिटॅमिन 'डी' मिळते.
भारत उष्णकटिबंध प्रदेशात येत असला, तरीही अनेकांमध्ये व्हिटॅमिन 'डी'ची कमतरता असते. उन्हात न जाणे हे त्यामागचे मूळ कारण आहे.
व्हिटॅमिन 'डी' मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे सूर्यप्रकाश. राेज कमीत कमी १५ ते २५ मिनिटे उन्हात फिरले पाहिजे. तर व्हिटॅमिन 'डी' मिळते.
सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन 'डी' हवे असल्यास शरीराच्या ४० टक्के भागावर थेट सूर्यप्रकाश पडला पाहिजे. त्यावेळी सनस्क्रीम लावू नये.
सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत उन्हात फिरल्यास सर्वाधिक व्हिटॅमिन 'डी' शरीराला मिळते. यावेळेत उन्हात गेले पाहिजे.
छत्री घेऊन किंवा काचेच्या मागे उभे राहून उन्हात उभे राहिल्यास व्हिटॅमिन 'डी' मिळत नाही. थेट सूर्यप्रकाश स्कीनवर पडला पाहिजे.
व्हिटॅमिन 'डी'च्या कमतरतेमुळे थकवा येणे, हाडं, जाॅईंट्स दुखणे हे त्रास हाेऊ लागतात.
व्हिटॅमिन 'डी'च्या कमतरतेमुळे जखमा लवकर भरत नाहीत. सतत तुमचे मूड स्विंग हाेतात.
केस गळणे ही एक काॅमन समस्या झाली आहे. व्हिटॅमिन 'डी'च्या कमतरतेमुळेही हा प्राेब्लेम येता.
दरराेज उन्हात फिरा, स्वतःच्या आराेग्याची काळजी घ्या. तरीही त्रास जाणवत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.