'या' कारणामुळे साखर न खाताही वाढते शुगर लेव्हल
शुगर असलेल्या अनेक पेशंटची तक्रार असते की, आहारातून साखर वगळल्यानंतरही शुगर लेव्हल कायम वाढलेली असते.
शुगर लेव्हल वाढण्यामागे फक्त साखर हे एकच कारण नाहीये. तर, अन्य काही कारणांमुळेही शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं.
सर्दी, खोकला झाला असेल तर शरीरात स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. ज्यामुळे साखरेचं प्रमाणही वाढतं.
मानसिक ताण, टेन्शन, अपूर्ण झोप यांसारख्या समस्येमुळेही शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं.
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झालं तरीदेखील साखरेचं प्रमाण वाढतं.
मासिक पाळीच्या काळात एस्ट्रोजनचं प्रमाण कमी झालं असतं. ज्यामुळे शरीरातील इन्सुलिनचं कार्य सुरळीतपणे होत नाही. यामुळे सुद्धा ब्लड शुगर वाढू शकते.
सूज किंवा अन्य कोणत्या आजारावर तुम्ही स्टेरॉयडची औषधे घेत असाल तरीदेखील रक्तातील साखर वाढू शकते.
मधुमेही व्यक्तींनी वेळेवर गोळ्या घेतल्या नाहीत.तर त्यांची शुगर लेव्हल वाढू शकते.