पुरूषांच्या 'या' लैंगिक समस्या देतात ह्रदय विकाराचा इशारा
लैंगिक समस्या या ह्रदयविकाराशी संबंधित सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
लैंगिक समस्या ह्रदय विकाराचे लक्षण असू शकतात. लिंगाच्या ताठरतेची समस्या (Erectile Dysfunction) आणि लवकर वीर्यस्खलन (PE) ही ह्रदयविकाराशी संबंधित सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
ह्रदयविकार आणि लिंगाची ताठरतेची समस्या या दोन्ही समस्या शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यानं (Endothelial Dysfunction) निर्माण होतात. त्यामुळे लिंगात रक्तप्रवाह मंदावतो आणि ताठरता मिळत नाही.
ह्रदयविकार असलेल्या व्यक्तींना ED होण्याचा धोका जास्त असतो; संशोधनानुसार ६४% पुरुषांना ED (Impotency), तर ८% ला PE आढळतात.
लिंगातील रक्तवाहिन्या ह्रदयाच्या रक्तवाहिन्यांपेक्षा लहान असतात, त्यामुळे लिंगाच्या ताठरतेची समस्या हे तुम्हाला ह्रदय विकार असण्याच्या शक्यतेचं पहिलं लक्षण असू शकतं.
लिंगाच्या ताठरतेची समस्या ही मधुमेह, उच्च रक्तदाब, धुम्रपान, कोलेस्ट्रॉल, लठ्ठपणा या व्याधींची शक्यता वाढवते.
ह्रदयविकारासाठी घेतल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे, जसे की बोटाब्लॉकर, काही ब्लडप्रेशर औषधे यामुळे लैंगिक समस्या वाढू शकतात.
लिंगातील ताठरतेचा अभाव आणि ह्रदयविकार होते तेव्हा लैंगिक इच्छा, स्वतःबद्दल आत्मविश्वास, किंवा उत्तेजना कमी होते. ही मानसिक आणि शारीरिक कारणांनी होते.
लवकर वीर्यस्खलन समस्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ह्रदयविकाराशी संबंध येतो. अत्यधिक Sympathetic Nervous System Activity (ताण, चिंता), हृदयाचे कार्य आणि लवकर वीर्यस्खलन यांच्या संबंधाची निरीक्षणं आहेत.
ह्रदयविकार उत्पन्न झाल्यावर चिंता, नैराश्य, तणाव हे लैंगिक कार्यावर नकारात्मक परिणाम करतात.