वाढलेल्या स्ट्रेस लेवलमुळं रात्री शांत झोप लागत नाही. मात्र विशिष्ट फळं अन् फूड खाल्यानंतर स्ट्रेस लेवल नियंत्रणात राहण्यात मदत होते.
कोर्टिसोल हे शरिरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन मानलं जातं. हे हार्मोन दिवसभरात आपली एनर्जी लेवल, मूड आणि अलर्टनेस नियंत्रण करण्यात महत्वाची भूमिका निभावतात.
वाढलेल्या स्ट्रेस लेवलमुळं रात्री शांत झोप लागत नाही. मात्र झोपण्यापूर्वी काही विशिष्ट फळं अन् फूड खाल्यानंतर स्ट्रेस लेवल नियंत्रणात राहण्यात मदत होते.
हे खाद्य पदार्थ आपलं मन शांत करतात, शरिरातील स्ट्रेस लेव्हल नियंत्रणात आणण्यात मदत करतात. त्यामुळं चांगली झोप लागण्यात अडचण येत नाही.
किवी हे छोटं दिसणारं फळ आपण झोपण्यापूर्वी एक तास आधी खाल्लं तर लवकर झोप लागण्यास मदत मिळते. किवी आपल्या शरिरातील सेरोटोनिन तयार करण्यात मदत करतं.
यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यास महत्वाचं ठरतं. झोप चांगली झाल्यानं सकाळी तुम्हाला ताजेतवाणे आणि एनर्जेटिक वाटतं.
रात्री ओट्सचा एक छोटा गरम बाऊल खाल्ल्यानं आपलं डोकं शांत होतं. यातील ट्रिप्टोफॅन सारखे कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट, सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यात मदत करते.
कॅमोमाईलचा एक गरम कप झोपण्यापूर्वी घेतल्यानं आपली नर्वस सिस्टमला आराम पोहचतो. याचबरोबर यामुळं ब्लड शुगर लेव्हल देखील नियंत्रणात येते.
ग्रीक योगर्ट हे एक उत्तम प्रो बायोटिक्स आहे. हे ग्रीक योगर्ट हे पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. त्यात जर तुम्ही काही बेरीज मिक्स केल्या तर त्याचा अतिरिक्त फायदा मिळतो.
मॅग्नेशियम आणि पोटॅशियमयुक्त केळ हे देखील उत्तम झोप येण्यासाठी उपयुक्त ठरतं. रात्री झोपण्यापूर्वी एक केळ खाल्यानंतर स्नायू आणि नर्वस सिस्टम शांत होण्यात मदत होते.