दिवसभर डाेक्यात विचारांच चक्र सुरूच असतं का? विचार थांबतच नाहीत आणि हातातलं काम करताना लक्ष लागत नाही. तर, ओव्हर थिकींग थांबवण्यासाठी खास १० उपाय
सगळं परफेक्ट करणार, हाेणार ही अपेक्षाच चुकीची आहे. तुमच्याकडून चुका हाेणार हे मान्य करा. चुकांमधून शिका. यामुळे मनावरचा माेठा ताण कमी हाेईल.
मनातल्या गाेष्टी इतरांशी शेअर करा. काेणत्यातरी व्यक्तीशी बाेला, विचारांचा निचरा हाेण्यास मदत हाेते. डाेकं शांत हाेते.
रात्री झाेपण्याआधी दुसऱ्या दिवसाच प्लॅनिंग करून ठेवा. कामांचा प्राधान्यक्रम ठरलेला असला की डाेकं त्याप्रमाणे काम सुरू करेल. विचारात वेळ जाणार नाही.
डाेक्यात सातत्याने घाेळत राहणारे विचार लिहून काढा. लिहील्यामुळे विचारांचा निचरा हाेण्यास मदत हाेते. डाेकं शांत हाेईल, लक्ष केंद्रित करता येईल.
तुमच्या कंट्राेलमध्ये काेणत्या गाेष्टी आहेत, तितक्याच गाेष्टींवर फाेकस करा. घडून गेलेल्या, कंट्राेलमध्ये नसणाऱ्या गाेष्टींचा विचार करणे टाळा.
ओव्हर थिकींग थांबवण्यासाठी राेज ५ मिनीट शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. राेज प्रॅक्टिस केल्यावर ही गाेष्ट सहज जमायला लागेल.
डाेक्यात जास्त विचारांची गर्दी झाली असेल, तेव्हा चालायला जा, स्ट्रेचिंग करा. शारीरिक हालचालींमुळे मन शांत हाेण्यास मदत हाेईल.
नियमित व्यायाम करा. राेज धावणे, चालणे, याेगा किंवा अन्य व्यायाम किमान अर्धा तास करत जा. शरीर सुदृढ असेल तर मन शांत राहाते.
साेशल मिडीयावर स्क्राेलिंग करण्यावर स्वतःच आळा घाला. स्क्राेलिंग वाढल्यानेही टेन्शन वाढते. साेशल मिडीयासाठी दिवसातला ठराविक वेळ ठरवून घ्या.
सतत माेबाईल हातात ठेवण्याची सवय बंद करा. गरज असेल, काम असेल त्यावेळेतच हातात माेबाईल घ्या. यामुळेही तुमच्या डाेक्यातील विचारांचे चक्र थांबेल.