महिनाभर चहा पिणं सोडल्यास शरीरात नेमकं काय घडतं ?

महिनाभर चहा पिणे बंद केले, तर शरीरात नेमके काय बदल होतात? आरोग्यावर त्याचा काय परिणाम दिसतो?

'चहा' आपल्यापैकी अनेकांसाठी केवळ एक पेय नसून एक 'इमोशन' आहे.

चहा मधील कॅफीन आणि साखरेचे अति प्रमाण नकळत आपल्या आरोग्यावर परिणाम करत असते. 

महिनाभर चहा पिणे बंद केले, तर शरीरात नेमके काय बदल होतात? आरोग्यावर त्याचा काय परिणाम दिसतो?

चहामधील कॅफीन झोपेच्या चक्रात अडथळा आणते, चहा सोडल्यामुळे वेळेवर आणि शांत झोप लागण्यास मदत होईल.

रिकाम्या पोटी चहा पिण्याने पित्त किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास होतो. महिनाभर चहा टाळल्यास पचनक्रिया सुधारेल आणि जळजळ कमी होईल.

चहा सोडल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते आणि वजनावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते. 

चहामुळे दातांवर पिवळे डाग पडतात किंवा इनॅमल खराब होते. चहा सोडल्याने दात पांढरे आणि हिरड्या निरोगी राहतात.

चहामुळे बिघडलेली पचनसंस्था हळूहळू पूर्ववत होते आणि भूक नीट लागते.

चहाऐवजी हर्बल टी, कोमट पाणी, लिंबूपाणी, ग्रीन टी हे उत्तम पर्याय ठरू शकतात.

Click Here