कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घ्या...
आपल्या सौंदर्यासाठी, दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी.
अभिनेत्री साई पल्लवी सध्या प्रचंड चर्चेत आहे. लवकरच ती 'रामायण' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.
परंतु, तुम्हाला माहिती आहे का? साई पल्लवीने एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं आहे. तिच्याकडे मेडिकलची डिग्रीदेखील आहे.
'Tbilisi State Medical University' मधून तिने आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.
२०१५ मध्ये साई पल्लवीने 'प्रेमम' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं.
मात्र, त्यावेळी ती एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. यशाची हवा डोक्यात जाऊ न देता साईने आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण केलं.
साई पल्लवी लवकरच नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' सिनेमात झळकणार आहे. यात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.