रात्रीच्या अंधारात चमकणारे तारे पाहिले की सगळ्यांना आनंद हाेताे. चमकणाऱ्या गाेष्टी खूप छान दिसतात. पण, कधी झाडं चमकताना पाहिली आहेत का?
निसर्गात अनेक चमत्कार हाेत असतात. त्यातलाच एक चमत्कार म्हणजे रात्री झाडं चमकतात. रात्रीच्या अंधारात ही झाड चमकून अनेकांचे लक्ष वेधून घेतात.
रात्री चमकणाऱ्या झाडांना बायाेल्युमिनेसन्स असे म्हणतात. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यात झाडं किंवा फंगस स्वतःच प्रकाश निर्माण करतात.
काही विशेष प्रकारच्या फंगस झाडांच्या सालावर वाढतात. हे फंगस अंधारात हिरवट - निळसर प्रकाश देतात.
झाडांवर निर्माण हाेणारा हा प्रकाश काजव्यांसारखा चमकणारा असताे. डाेंगरावरून रात्री चालताना जंगलात दिवे लावले आहेत, असे चित्र दिसते.
पूर्वीच्या काळात या झाडांमध्ये जादू आहे असे मानले जायचे. गावकऱ्यांचा विश्वास हाेताे की, देव - देवता हे दिवे लावतात.
फंगसच्या पेशींमध्ये ल्युसिफेरेस नावाचं एन्झाइम असतं. याच्या केमिकल रिऍक्शनमुळे प्रकाश निर्माण हाेताे.
भारतात पश्चिम घाट, आसाम, अंदमानच्या जंगलात अशा प्रकारची झाडे आढळून येतात.
जगात ब्राझील, ऑस्ट्रेलिया, मलेशिया आणि आफ्रिकेच्या डाेंगराळ भागातही अशी चमकणारी झाडे आढळून येतात.