शुक्र ग्रहाविषयी तुम्हाला या गाेष्टी माहित आहेत का? शुक्र ग्रहावर अनेक गाेष्टी वेगळ्याच घडतात. त्याविषयी जाणून घेऊ या.
शुक्र ग्रहावर एक वर्ष असतं छाेटं. पण, एक दिवस हा एका वर्षापेक्षा माेठा असताे, हे तुम्हाला माहिती आहे का?
पृथ्वीवर एक दिवस हा २४ तासांचा असताे. पण, शुक्राला स्वतःभाेवती फिरायला लागतात, तब्बल पृथ्वीवरील २४३ दिवस.
शुक्राचे सूर्याभाेवतीचे भ्रमण हे पृथ्वीवरील २२५ दिवसांमध्ये पूर्ण करताे. त्यामुळेच तिथलं वर्ष हे एका दिवसांपेक्षा लहान असतं.
पृथ्वीवर दिवस २४ तासांचा असताे, आणि वर्ष हे ३६५ दिवसांचे असते.
शुक्रावर दिवस २४३ दिवसांचा असताे आणि शुक्रावरचे वर्ष हे २२५ दिवसांचे असते.
शुक्राची फिरण्याची दिशासुद्धा उलटी आहे. ताे बहुतांश ग्रहांचा उलट बाजूने फिरताे.
शुक्र ग्रह उलट फिरत असल्याने इथे सूर्याेदय पश्चिमेला हाेताे. सूर्यास्त पूर्वेला हाेताे, म्हणजे अगदी पृथ्वीच्या उलट हाेते.
शुक्र ग्रहाचं वातावरण खूप दाट आहे. त्यामुळे तिथं उष्णता अडकून राहते आणि पृष्ठभागाचं तापमान ४६०°C पेक्षा जास्त असतं.
एवढं जास्त तापमान आणि कार्बन डायऑक्साइडनं भरलेलं वातावरण आहे. या कारणामुळे शुक्रावर जीवनाची शक्यता फारच कमी आहे.