झाडंही गाणी ऐकतात, झटपट वाढतात!

झाडांची वाढ नीट हाेत नाही का? मग तुम्ही तुमच्या झाडांना कधी संगीत ऐकवलं आहे का? तुम्हाला ही गाेष्ट माहिती आहे का? 

जसं माणसांना संगीत आवडतं, तसं झाडांनाही संगीत आवडतं, हे शास्त्रीयदृष्ट्या आता सिद्ध झालं आहे. 

झाडांची वाढ चांगली व्हावी म्हणून झाडांना शास्त्रीय संगीत ऐकवले तर त्याचा नक्कीच फायदा दिसून येताे. 

शास्त्रीय किंवा साैम्य संगीताचा झाडांच्या वाढीवर परिणाम हाेताे. राेज झाडांना या प्रकारचे संगीत ऐकवल्यास त्यांची वाढ चांगली हाेते. 

१९६० च्या दशकात डाेराेथी रेटालॅक नावाच्या एका वैज्ञानिकाने या विषयावर एक प्रयाेग केला हाेता. 

या प्रयाेगात झाडांच्या एका गटाला शास्त्रीय संगीत ऐकवले, तर दुसऱ्या गटाला राॅक म्युझिक ऐकवण्यात आले. 

शास्त्रीय संगीत ऐकलेल्या झाडांची वाढ चांगली आणि वेगवान झाली. दुसऱ्या गटातल्या झाडांची वाढ तशी दिसून आली नाही. 

संगीत आणि झाडांच्या वाढीमध्ये एक शास्त्रीय कारण आहे. आवाजांच्या लहरींचा परिणाम झाडांच्या वाढीवर दिसून येताे. 

साैम्य आवाजाच्या लहरींचा झाडांच्या पेशींवर चांगला परिणाम दिसून येताे. त्यामुळे त्या झाडांची वाढ चांगली हाेते. 

यामुळेच अनेक बागकाम करणाऱ्या व्यक्ती साैम्य संगीत लावून झाडांची काळजी घेताना दिसतात. 

Click Here