चिंकी-मिंकीची जोडी तुटली!

जुळ्या बहि‍णींनी केली सिबलिंग डिवोर्सची घोषणा

कपिल शर्मा शोमधून चिंकी मिंकी या जुळ्या बहिणी लोकप्रिय झाल्या होत्या

सुरभी आणि समृद्धी अशी त्यांची नावं आहेत. त्या सोशल मिडिया इन्फ्लुएन्सर आणि युट्यूबर आहेत.   

दोघींना अभिनय आणि डान्सची आवड आहे. २०१९ मध्ये त्यांना कपिल शर्मा शोमध्ये बोलवण्यात आलं.

डान्स, सारखे कपडे घालणं आणि एकसाथ बोलण्याच्या त्यांच्या कलेने त्यांना लोकप्रिय बनवलं

यानंतर त्या अनेक इव्हेंट्स, ब्रँड प्रमोशन्समध्ये दिसल्या. त्यांना खूप काम मिळालं. पैसेही मिळाले.

मात्र आता दोघींनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जाहीर केलं. 

दोघी आता एकत्र काम करणार नसून वेगवेगळ्या मार्गाने आयुष्य एक्स्प्लोर करणार आहेत असं त्यांनी लिहिलं.

Click Here