बापरे! चक्क एका गाढवाची किंमत २ लाख, कारण...

बरेच शेतकरी गाढवांचा सांभाळ करून त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात

पाकिस्तानात सध्या एका गाढवाची किंमत दुचाकीच्या किंमती एवढी झाली असून लोकांसमोर नवं संकट उभे राहिले आहे. 

गाढवांच्या किंमतीमुळे हजारो लोकांना रोजगाराची समस्या भेडसावत आहे. कारण या किंमती वाढण्यामागे पाकचा मित्र चीनचा हात आहे

पाकिस्तानातील गाढवांना चीनमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे देशातील बहुतांश भागात एका गाढवाची किंमत २ लाखापर्यंत पोहचली आहे. 

चीनमध्ये गाढवाच्या चमडीचा वापर केला जातो. ज्यातून एजियाओ नावाचे औषध बनते. रोग प्रतिकारक, शक्तिवर्धकासाठी याचा वापर केला जातो. 

चीन दीर्घकाळापासून आफ्रिकेतून गाढवे आयात करत होता परंतु आफ्रिकन युनियनने गाढवांच्या चमडीचा व्यापार करण्यावर बंदी आणली आहे

आफ्रिकन देशांनी बंदी आणल्यानंतर चीनला पाकिस्तानातील गाढवांवर निर्भर व्हावे लागतेय. त्यामुळे इथल्या गाढवांची किंमत वाढली आहे

पाकिस्तानात डाँकी फार्म खोलण्यासाठी चीन पाक सरकारशी चर्चा करून कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण करत आहे.   

Click Here