सापाविषयी आपल्याकडे अनेक समज-गैरसमज आहेत.
साप म्हटलं की अनेकांचा थरकाप उडतो. सापाने दंश केला की अनेकदा मृत्यूचाही सामना करावा लागतो.
सापाचं विष हे शरीरात फार वेगाने पसरतं. मात्र, सापचं विष कोणत्या रंगाचं असतं हे तुम्हाला माहितीये का?
सापाविषयी आपल्याकडे अनेक समज-गैरसमज आहेत. यामध्येच सापाचं विष कोणत्या रंगाचं असतं यावरही अनेक मतमतांतरे आहेत.
सापाचं विष हे साधारणपणे फिकट पिवळ्या रंगाचं असतं. मात्र, काही प्रजातींमध्ये ते किंचित पांढऱ्या किंवा हिरवट रंगाचं दिसतं.
विषाचा रंग हा सापाच्या प्रजाती आणि त्यांच्या आहारावर अवलंबून असतं.
सापाचं विष घातक असलं तरीदेखील वैज्ञानिकदृष्ट्या ते अमूल्य आहे. अनेक औषधे, पेनकिलर्स तयार करतांना त्याचा उपयोग होतो.