स्मृती ते मेग! महिला ODI तील सेंच्युरीयन 'क्वीन' कोण?

एक नजर वनडेतील खास रेकॉर्डवर...

भारतीय महिला संघाची उप कर्णधार अन् सलामीची बॅटर स्मृती मानधना हिने ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे कारकिर्दीतील १२ वे शतक झळकावले.

पण तुम्हाला माहितीये का? महिला वनडेत सर्वाधिक शतकांचा विक्रम तिच्यापासून आणखी थोडा दूर आहे.

महिला वनडेत सर्वाधिक शतके ही मेग लेनिंगच्या भात्यातून आली आहेत. ऑस्ट्रेलियन बॅटरनं आपल्या कारकिर्दीत १५ शतके झळकावल्याची नोंद आहे.

न्यूझीलंडची सुझी बेट्स १३ शतकांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे.

इंग्लंड महिला संघातील स्टार क्रिकेटर टॅमी ब्युमाँट या यादीत १२ शतकासंह चौथ्या स्थानावर आहे. 

स्मृती मानधना महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्य कायम राखून या यादीत नंबर वन होऊ शकते. 

Click Here