क्रिकेटच्या मैदानातील राणी अन् तिच्या राजाची खास स्टोरी
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर स्मृती मानधना ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते.
स्मृती मानधना ही सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिला चीअर करण्यासाठी तिचा बॉयफ्रेंडही तिकडे पोहचलाय.
टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर असतानाच स्मृती मानधना हिने आपला वाढदिवस साजरा केला.
तू माझी सर्वात मोठी चीअरलीडर अन् प्रेरणा आहेस, अशा खास शब्दांत बॉयफ्रेंडनं स्मृतीवर प्रेम व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.
स्मृती मानधना अन् तिचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छल या दोघांमधील प्रेम कहाणीही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसते.
गेल्या काही दिवसांपासून ही जोडी "खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... या तोऱ्यात एकमेकांसोबत फिरताना दिसते.
दोघांनी आपापल्या सोशल मीडियावरून एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
स्मृती मानधनाचा बॉयफ्रेंड संगीतकार आणि फिल्म निर्माता आहे. 'तू ही है आशिकी' आणि 'पार्टी तो बनती है' यासारख्या हिट गाणी त्याने दिली आहेत.