'हे' छोटे बदल देतील आयुष्याला मोठा आकार 

खूप मोठ्या गोष्टी केल्या म्हणजे बदल घडतो असे नाही, तर छोट्या 'बेबीस्टेप्स' आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडतात त्या अशा... 

निराश झाल्यासारखं वाटतंय? बाहेर फेरफटका मारायला निघा. 

ताणतणाव जाणवतोय? रोज सकाळी प्रभातफेरी अर्थात मॉर्निंग वॉक सुरु करा. 

डोक्यात शेकडो विचार त्रास देताहेत? पुस्तक वाचा नाहीतर आवडता मुव्ही बघा. 

एकाकी पडल्यासारखं वाटतंय? रोज मंदिरात जा. 

लक्ष केंद्रित करताना त्रास होतो? ८ तासांची झोप पूर्ण करा. 

खूप राग येतो? रोज १० मिनिटं ध्यानधारणा करा. 

थकवा येतो? रोज हलका आणि शरीर मोकळे करणारा व्यायाम करा. 

खूप झोप येते? आळस येतो? रोज थंड पाण्याने अंघोळ करा. 

फोनचे व्यसन वाढले आहे? रोज तासभर ठरवून फोनचा वापर टाळा. 

कोणी आपल्याला समजून घेत नाही असं वाटतं? डायरी लिहून मन मोकळं करा. 

दुसऱ्यांशी सतत तुलना करता? सोशल मीडियाचा वापर कमी करा. 

आत्मविश्वास कमी आहे? रोज आरशासमोर उभं राहून सकारात्मक गोष्टी बोला. 

Click Here