या यादीत किलर मिलरचंही नाव
ओमानच्या मोहम्मद नदीम हा टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अर्धशतक झळकवणारा सर्वात वयस्कर फलंदाज ठरला आहे.
श्रीलंकेविरुद्ध त्याने ५२ चेंडूत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वात धीम्या अर्धशतकाचीही नोंद केली.
पाकच्या मोहम्मद रिझवान याने २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये न्यूयॉर्कच्या मैदानात ५२ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
टी-२० वर्ल्ड कपमधील स्लो फिफ्टी ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा किलर मिलरचाही समावेश आहे.
२०२४ च्या हंगामात डेविड मिलरने नेदरलँड्सविरुद्ध ५० चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
२००७ च्या पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत वेस्ट इंडिजच्या डेवॉन स्मिथनं बांगलादेशविरुद्ध अर्धशतकासाठी ४९ चेंडूचा सामना केला होता.
ऑस्ट्रेलियाच्या डेविड हसीनं २०१० च्या हंगामात इंग्लंडविरुद्ध अर्धशतकासाठी ४९ चेंडू खेळले होते.
सूर्यकुमार यादवनं २० वर्ल्ड २०२४ च्या हंगामात अमेरिकेविरुद्ध ४९ चेंडूत ठोकलेली फिफ्टीही 'स्लो' ठरली होती.