रात्री ठरलेल्या पाेझिशनला झाेपलं तरच पटकन, चांगली झाेप लागते, असं तुमच्या बाबतीत आहे का? पण, झाेपताना काेणती पाेझिशन चांगली माहितीये का?
काही जणांना रात्री झाेपताना पाेटावर झाेप चांगली लागते. पण, तुम्ही असे पाेटावर झाेपत असाल, तर तुमची ही सवय आजच बदला.
तुम्ही रात्री काेणत्या पाेझिशनला झाेपता, त्याचा तुमच्या आराेग्यावर थेट परिणाम हाेताे, हे तुम्हाला माहितेय का?
पाेटावर झाेपल्याने श्वसनमार्गावर दाब येताे आणि श्वास घ्यायला त्रास हाेऊ शकताे.
पाेटावर रात्रभर झाेपल्यास पाठीचा कणा आणि मानेवर परिणाम हाेताे. दीर्घकाळ असं झाेपल्यास पाठदुखीचा त्रास हाेऊ शकताे.
रात्रभर पाेटावर झाेपल्याने त्या व्यक्तींना सकाळी त्यांची मान दुखते. किंवा त्यांना स्टीफनेस जाणवताे, ही सामान्य समस्या दिसून येते.
पाेटावर झाेपल्याने काही लाेकांचे घाेरणे कमी हाेते. त्यामुळे घाेरणाऱ्या काही लाेकांसाठी ही आरामदायक पाेझिशन असते.
झाेपण्यासाठी उत्तम पाेझिशन म्हणजे पाठीवर सरळ झाेपणे. या पाेझिशनमध्ये पाठीचा कणा सरळ राहताे, काेणताही त्रास हाेत नाही.
पाठीवर झाेपल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या कमी पडतात. त्वचा चांगली राहते, कारण त्वचेवर काेणताही दाब नसताे.
डाव्या कुशीला झाेपणं ही चांगल मानलं जातं. यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत हाेते. हृदयावर दाब येत नाही.
उजव्या कुशीवर झाेपल्याने पचनाला अडथळे येऊ शकतात. शक्यताे उजव्या कुशीवर झाेपणे टाळले पाहिजे.