झाेप लागली आणि अचानक आपण उडी मारली किंवा आपला पाय घसरला असं वाटतं. आपण जागे हाेताे. तुमच्या बराेबर पण असं घडलंय का?
७० टक्के लाेकांना हा अनुभव आयुष्यात एकदा तरी येताे. दचकून जागे हाेतात. हा अनुभव संपूर्णपणे सामान्य आहे.
झाेप लागल्यावर अचानक उडी मारल्यासारख वाटतं, त्याला Hypnic Jerk किंवा Sleep Start असे म्हणतात.
झाेपताना अचानक हात - पाय हलतात. या अनुभवामुळे दचकून जाग येते. बहुतांश लाेकांना अनुभव घेताे.
झोप लागल्यावर काही क्षणात हे घडते. झाेपेच्या सुरूवातीच्या टप्प्यात हे सगळे घडते.
मेंदूला कधी - कधी शरीर रिलॅक्स हाेताना पडल्यासारख वाटतं, मग ताे स्नायूंना झटका देताे. त्यामुळे दचकल्यासारखे वाटते.
शास्त्रज्ञांच्या मते, झाेपताना आपण झाडावरून पडू नये, म्हणून मेंदू दचकण्याची सवय टिकवून ठेवताे. हा मेंदूचा जुना सुरक्षात्मक सिग्नल आहे.
ज्या व्यक्तींना जास्त ताण, चिंता किंवा थकवा असताे, त्यांना Hypnic Jerk हाेण्याची शक्यता असते.
झाेपण्यापूर्वी काॅफी, चहा किंवा एनर्जी ड्रिंक घेतल्यास दचकण्याचे प्रमाण वाढते.
झाेपेत दचकणे हा एक सिग्नल आहे की, शरीर रिलॅक्स हाेत आहे. हा काेणत्याही प्रकारचा आजार नाही.
झाेपण्यापूर्वी माेबाईल, स्ट्रेस टाळा, रिलॅक्सेशन एक्ससाइज करा, यामुळे दचकण्याचे प्रमाण कमी हाेईल.