जून २०२५ च्या टॉप-१० सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हीच्या यादीत सामील.
Skoda Kylaq : भारतीय बाजारपेठेत मध्यमवर्गीय ग्राहकांकडून स्कोडाच्या एन्ट्री लेव्हल Kylaq एसयूव्हीला चांगला प्रतिसाद मिळतोय.
जून २०२५ च्या विक्रीच्या आकडेवारीवरुन Kylaq च्या मागणीचा अंदाज लावू शकता. गेल्या महिन्यात ३,१९६ ग्राहकांनी ही एसयूव्ही खरेदी केली आहे.
जून २०२५ च्या टॉप-१० बेस्ट सेलिंग कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या यादीत स्कोडा Kylaq चा समावेश आहे.
स्कोडा Kylaq ची सुरुवातीची किंमत ७.८९ लाख रुपयांपासून सुरू होऊन, टॉप मॉडेलची किंमत १४.४० लाख रुपयांपर्यंत जाते.
स्कोडा Kylaq च्या किंमतीत मारुती ब्रेझा, टाटा नेक्सन, किआ सोनेट, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूव्ही ३एक्सओ सारख्या कारदेखील मिळतात.
स्कोडाची ही नवीन कार पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक, अशा सर्व प्रकारांमध्ये बाजारात उपलब्ध आहे.
स्कोडा Kylaq १.०-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनने सुसज्ज आहे. कारमधील हे इंजिन ११३ बीएचपी पॉवर जनरेट करते आणि १७९ एनएम टॉर्क देते.
ही एसयूव्ही मॅन्युअल मोडमध्ये १९.६८ किमी प्रति लिटर आणि ऑटोमॅटिक मोडमध्ये १९.०५ किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देते.
यात एलईडी हेडलॅम्प आणि टेललॅम्प, ड्युअल-स्पोक मल्टी-फंक्शन स्टीअरिंग व्हील, इलेक्ट्रिक सनरूफ आणि क्रूझ कंट्रोलसारखे फीचर मिळतात.
या कारमध्ये वायरलेस अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोसह १०.१-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील आहे. कारमध्ये ४४६ लिटरची बूट स्पेस मिळते.