हवेतील बदलामुळे अनेकदा चेहऱ्यावर मुरुम, फोड किंवा डाग पडतात.
बदलत्या वातावरणाचा परिणाम थेट आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर होत असतो. त्यामुळे या दोन्ही गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे.
हवेतील बदलामुळे अनेकदा चेहऱ्यावर मुरुम, फोड किंवा डाग पडतात. त्यामुळेच बदलत्या ऋतुनुसार कोणतं फेशियल करावं ते पाहुयात.
पावसाळ्यात चारकोल, नीम यांचा समावेश असलेलं फेशियल निवडावं. तसंच एक्स्ट्रा ऑइल कंट्रोल करणाऱ्या फेशियलला प्राधान्य द्यावं.
उन्हाळ्यात शक्यतो फ्रूट फेशिअल करावं. यात स्कीनला थंडावा देणाऱ्या घटक पदार्थांचा समावेश असावा.