एकाचवेळी घर आणि करिअर या जबाबदाऱ्या पार पाडतांना स्त्रिया स्वत:कडे दुर्लक्ष करतात.
आजच्या काळातील स्त्री घर आणि करिअर या दोन्हींची जबाबदारी लिलया पेलत आहे.
एकाचवेळी दोन जबाबदाऱ्या पार पाडतांना या स्त्रिया मात्र स्वत:कडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच, वर्किंग वूमन्ससाठी आपण आज काही ब्युटी टीप्स पाहणार आहोत.
सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी सौम्य फेशवॉशने चेहरा धुवावा. यावेळी शक्यतो, थंड पाण्याचा वापर करावा.
फेशवॉश झाल्यानंतर टोनरचा वापर करावा. ज्यामुळे स्कीनचे पोर्स टाइट होतात. त्यानंतर मॉश्चराइजर लावावं.
सुट्टीचा दिवस असो वा वर्किंग सनस्क्रीन लावायचं विसरु नका. यात SPF 50 चं सनस्क्रीन दिवसातून ३-४ तासांच्या अंतराने लावावं.
कमीत कमी मेकअप करावा. हेवी मेकअपपेक्षा सीसी किंवा बीबी क्रीमचा वापर करावा.