रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक वर्किंग वूमनने ट्राय करा या टिप्स
प्रत्येक स्त्री ही दररोज वेगवेगळ्या पातळींवर तिची लढाई लढत असते. घर, ऑफिस या दोन्ही गोष्टी सांभाळतांना तिची तारेवरची कसरत होते.
कुटुंब, ऑफिस यांचा भार डोक्यावर घेऊन चालतांना स्त्रिया कायम स्वत:कडे दुर्लक्ष करतात. परंतु, आज आपण वर्किंग वूमनसाठी बेस्ट स्कीन केअर टिप्स कोणत्या ते पाहुयात.
वर्किंग वूमनला स्वत:साठी फार कमी वेळ मिळतो. परंतु, या वेळेचा योग्य उपयोग केला तर ती नक्कीच तिच्या आरोग्याकडे आणि त्वचेकडे लक्ष देऊ शकते.
रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी सुद्धा फेशवॉशने चेहरा स्वच्छ धुवून झोपा. कितीही कंटाळा आला तरी सुद्धा फेशवॉश वापरणं स्कीप करु नका. फेशवॉश वापरल्यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त धूळ, माती निघून जाते.