5 गोष्टींमुळे पकडला जाईल खोटेपणा
काही व्यक्ती सराईतपणे खोटं बोलून एखाद्याची दिशाभूल करत असतो. परंतु, तो खोटं बोलतोय हे नेमकं कसं ओळखायचं ते पाहुयात.
खोटं बोलणारी व्यक्ती कधीच नजरेला नजर देऊन बोलत नाही.
ज्यावेळेस एखादी व्यक्त खोटं बोलत असते त्यावेळी ती प्रचंड अस्वस्थ असते.तिचा अस्वस्थपणा तिच्या कृतीतून दिसून येतो.
ज्यावेळी समोरचा माणूस खोटं बोलतो त्यावेळी तो उगाचच प्रमाणापेक्षा जास्त समजून सांगायचा किंवा त्याविषयी डिटेल्स देण्याचा प्रयत्न करतो.
आपण जर एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर देतांना तो बराच वेळ घेत असेल किंवा तुटक-तुटक उत्तर देत असेल तर समजून जा तो खोट बोलतोय.
आपण खरे आहोत हे सांगण्यासाठी खोटारडी व्यक्ती बळजबरी आणि खोटं हसण्याचा प्रयत्न करतात.