आपल्या घरी येणारं दूध हे शुद्ध आहे की नाही हे ओळखण्याच्या काही ट्रिक्स
सध्या बाजारात अनेक प्रकारचे आणि वेगवेगळ्या ब्रँडचे दूध सहज उपलब्ध आहेत.
प्रत्येक ब्रँड त्याच्या दूधाची जाहिरात करतांना ते शुद्ध असल्याचाच दावा करतात. परंतु, हे दूध खरंच शुद्ध असतं का?
आपल्या घरी येणारं दूध हे शुद्ध आहे की नाही हे ओळखण्याच्या काही ट्रिक्स आहेत. त्या पाहुयात.
दुधात भेसळ झालीये की नाही हे पाहण्यासाठी दूध लाटण्यावर थोडंसं टाका. त्यानंतर लाटणं उभं करा. जर दूध खाली घसरलं आणि पांढरट ओळख आला तर ते शुद्ध आहे.
दुधामध्ये आयोडिनचे काही थेंब टाकून बघा. दुधाचा रंग बदलून निळसर झाला तर त्या दूधात भेसळ झाल्याचं समजून जा.
दूधाचे काही थेंब हातावर घ्या आणि दोन्ही हात चोळा. जर हात तेलकट झाले तर ते दूध भेसळयुक्त आहे. कारण, शुद्ध दुधात तेलकटपणा नसतो.
दूध उकळून जेव्हा आटतं तेव्हा जर त्यात लहान लहान गाठी दिसत असतील, तर ते भेसळीचं आहे.