चांदीला नवी चकाकी! चार दिवसात 7,800 रुपयांची वाढ

सव्वा दोन महिन्यांनंतर चांदीच्या भावाने गाठला नवा उच्चांक 

चांदीची भाववाढ सुरूच असून, ६ जून रोजी एकाच दिवसात तब्बल ४ हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख पाच हजार ८०० रुपये नव्या उच्चांकी भावावर पोहोचली आहे.

गेल्या पाच दिवसांपासून सोने चांदीचे भाव दररोज वाढत आहेत. यात सोन्याच्या भावात फारशी वाढ झाली नाही. मात्र, चांदीच्या भावात ५ जून वगळता रोज मोठी वाढ सुरू आहे.

२ जून रोजी ५०० रुपयांची वाढ होऊन चांदी ९८ हजारांवर पोहोचली होती. ३ रोजी दोन हजार ५००, ४ रोजी एक हजार १०० रुपयांच्या वाढीसह चांदी एक लाख १,६०० रुपयांवर पोहोचली.

चांदीच्या भावाची गेल्या चार दिवसांची स्थिती पाहिली तर त्यात सात हजार ८०० रुपयांची वाढ झाली आहे. २ जून रोजी ९८ हजारांवर असलेली चांदी ६ जून रोजी १ लाख ५८०० रुपये प्रतिकिलो झाली.

६ जून रोजी तर चांदीत थेट चार हजार १०० रुपयांची वाढ झाली. त्यामुळे चांदी एक लाख पाच हजार ८०० रुपये प्रतिकिलो अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचली.

यापूर्वी २८ मार्च रोजी चांदी एक लाख दोन हजार अशा उच्चांकी भावावर पोहोचली होती. त्यानंतर हा भाव कमी-कमी होत गेला.

आता पुन्हा ३ जूनपासून चांदीचा भाव एक लाख पार गेला व सव्वा दोन महिन्यांनंतर ६ जून रोजी चांदीचा भाव एक लाख पाच हजार ८०० अशा नव्या उच्चांकी भावावर पोहोचला.

Click Here