लिव्हर बिघडतंय? ही आहेत फॅटी लिव्हरची ५ महत्त्वाची लक्षण
अनेकांना आपलं फॅटी लिव्हर आहे हे माहितच नसतं. म्हणूनच,फॅटी लिव्हरची सुरुवातीची काही लक्षण पाहुयात.
सध्याच्या काळात चुकीचा आहार आणि लाइफस्टाइल यांच्यामुळे अनेकांमध्ये फॅटी लिव्हरची समस्या बळावत आहे. अनेकांना नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज सुद्धा असतो.
अनेकांना आपलं फॅटी लिव्हर आहे हे माहितच नसतं. म्हणूनच,फॅटी लिव्हरची सुरुवातीची काही लक्षण पाहुयात.
अचानकपणे वजन वाढणे हे फॅटी लिव्हरचं लक्षण आहे. यात पोटाजवळील चरबीचा वाढू लागते.
व्यवस्थित झोप झाल्यानंतरही सतत थकल्यासारखं वाटणे.
उजव्या बाजूला पोटाच्या वरच्या भागात सातत्याने दुखत असेल तर ते फॅटी लिव्हरचं लक्षण असू शकतं.
लघवीचा रंग गडद होणे आणि शौचाचा रंग फिकट होणे हे फॅटी लिव्हरचं लक्षण आहे.