Vitamin D च्या अतीसेवनानं होतं मोठं नुकसान 

व्हिटॅमिन डीचे काही दुष्परिणाम देखील आहेत.

व्हिटॅमिन डी मानवी आरोग्यासाठी दोन आवश्यक कार्ये करते, हाडांची वाढ आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे.

सध्या ओरली, इंजेक्शनद्वारे व्हिटॅमिन डी घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. मात्र व्हिटॅमिन डीचे काही दुष्परिणाम देखील आहेत. 

कॉमन  दुष्परिणाम म्हणजे इंजेक्शनच्या ठिकाणी वेदना किंवा सूज येणे जे काही तासांत किंवा दिवसांत स्वतःहून निघून जाते.

व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्याने भूक न लागणे आणि वजन कमी होऊ शकते, तसेच शरीरातील स्नायू कमकुवत होऊ शकतात.

व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्याने शरिरात धोकादायकपणे उच्च कॅल्शियम पातळी निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मूत्रपिंडांचे नुकसान होते आणि मुतखडा तयार होतो.

रक्तातील व्हिटॅमिन डीचे प्रमाण जास्त झाल्यावर, तहान वाढते आणि वारंवार लघवी होते.

क्वचित प्रसंगी, व्हिटॅमिन डीच्या उच्च डोसमुळे हृदयाचे ठोके वाढू किंवा, मंद होऊ शकतात.

Click Here