अनेक ठिकाणी मुलांना चहापोळी, चहा-बिस्किट असं सर्रास खायला दिलं जातं.
अनेक घरांमध्ये मोठ्यासोबतच लहान मुलांनाही चहा दिला जातो.
चहापोळी, चहा-बिस्किट असं सर्रास मुलांना खायला दिलं जातं. परंतु, मोठ्यांसाठी चहा एनर्जी ड्रिंक असलं तरीदेखील मुलांसाठी तो घातक आहे.
चहामुळे लहान मुलांच्या वाढीवर, स्वभावावर आणि झोपेवर परिणाम होतो.
अनेकदा सातत्याने मुलांनी चहाचं सेवन केलं तर त्यांना टाइप १ चा मधुमेह होण्याची शक्यता असते.
कॅफीनयुक्त चहा प्यायल्यामुळे मुलांचं वजन झपाट्याने वाढू शकतं.
चहामुळे मुलांना हृदयरोग, दाताला कीड लागणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.