झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी घ्या 'ही' काळजी

साधारणपणे वयस्क लोकांना किंवा मानसिक तक्रारी असलेल्या व्यक्तींमध्ये झोपेच्या गोळ्या घेण्याचं प्रमाण अधिक असतं. 

कामाचा ताण, टेन्शन यांसारख्या तक्रारींमुळे अनेकदा रात्रीची झोप पूर्ण होत नाही. किंवा, काही जणांना आजारपणामुळे झोप येत नाही. अशावेळी अनेकजण झोपेच्या गोळ्यांचा आधार घेतात.

साधारणपणे वयस्क लोकांना किंवा मानसिक तक्रारी असलेल्या व्यक्तींमध्ये झोपेच्या गोळ्या घेण्याचं प्रमाण अधिक असतं. मात्र, या गोळ्या घेण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.

झोपेच्या गोळ्या घेण्यापूर्वी कायम डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय चुकूनही झोपेच्या गोळ्या घेऊ नयेत.

दिवसभराची कामं झाल्यानंतर बेडवर झोपण्यापूर्वी गोळ्या घ्याव्यात. या गोळ्या कधीही झोपण्याच्या १-२ तास अगोदर घेऊन घेऊन ठेऊ नये.

शक्यतो प्रवास करतांना झोपेच्या गोळ्या घेऊन नयेत. तसंच पॉवर नॅप घेतांनाही या गोळ्या घेऊ नयेत.

झोपेच्या गोळ्या जर तुम्ही घेत असाल तर चुकूनही मद्यपान करु नका. कारण, यामुळे चक्कर येणे, अस्वस्छ वाटणे यांसारख्या समस्या उद्धभवू शकतात. 

(वरील माहिती सर्वसामान्य माहितीच्या आधारावर आहे. कोणत्याही गोष्टी अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा वा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

लसूण खाण्याचे अनेक फायदे जाणून घ्या

Click Here