वजन वाढीचा आणि झोपेचा आहे जवळचा संबंध
निरोगी राहण्यासाठी सकस आहारासोबतच शरीराला ७ ते ८ तासांची पुरेशी झोपदेखील तितकीच गरजेची आहे.
शरीराला पुरेशी झोप मिळत नसेल तर अनेक शारीरिक तक्रारी डोक वर काढतात. त्यामुळेच व्यवस्थित झोप न घेण्याचे तोटे कोणते ते पाहुयात.
तुम्ही दिवसातून केवळ ६ तास झोप घेत असाल तर तुमच्या रक्तातीत साखरेचं प्रमाण वाढू शकतं.
अपूर्ण झोप झाल्यामुळे नैराश्य, चिडचिड होणे, मानसिक ताण यांसारख्या समस्या निर्माण होतात.
शरीराला ८ तास झोप न मिळाल्यास हार्ट अॅटॅक वा हृदयासंबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात.
दिवसभरात केवळ ६ तास झोप घेतल्यास शरीरातील ग्रेलिन हे हार्मोन्स सक्रीय होतात. परिणामी,शरीराचं वजन वाढू शकतं.
रोगप्रतिकारक शक्तीदेखील अपूर्ण झोपेमुळे कमी होते.