अचानक साखर खाणं बंद केलंय? निर्माण होतील या समस्या

साखर सोडायची असेल तर ती हळूहळू खाणं बंद केलं पाहिजे.

बऱ्याचदा काही जण वजन कमी करण्यासाठी किंवा शुगर लेव्हल वाढल्यामुळे अचानक साखर खाणं बंद करतात.

साखर खाणं अचानकपणे बंद केलं तर त्याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. त्यामुळे साखर सोडायची असेल तर ती हळूहळू खाणं बंद केलं पाहिजे.

अचानकपणे तुमच्या शरीराला मिळणारी साखर बंद झाली तर त्यामुळे मूड स्विंग्स होऊ शकतात. यामुळे चिडचिड, नैराश्य यांसारख्या समस्या उद्भवतात.

साखर सोडल्यामुळे झोपेची समस्या निर्माण होते. व्यवस्थित झोप न लागणे, अचानकपणे जाग येणे या समस्या उद्भवतात.

साखर कधीही टप्प्याटप्प्याने सोडावी. एकदम सोडल्यामुळे पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. यात पोटात सूज येणे, चयापचय क्रियेत बिघाड होणे या समस्या होतात.

साखर सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावर गोड खायची इच्छा होते. त्यामुळे मग साखरेऐवजी मध किंवा फळांचं सेवन करा.

साखर सोडल्यामुळे थकवा किंवा अशक्तपणा जाणवतो.

काळे डाग पडलेले कांदे खाताय? आजच व्हा सावध

Click Here