अती प्रमाणात प्रोटीन घेणं ठरतंय घातक; निर्माण होतील 'या' शारीरिक समस्या

सुपरफूड म्हणून प्रोटीनचं सेवन करताय? निर्माण होतील या समस्या

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केला तर ते घातकच असतं. त्याचप्रमाणे जर प्रमाणापेक्षा जास्त प्रोटीनयुक्त पदार्थांचं सेवन केलं तर ते सुद्धा शरीरासाठी घातकच ठरु शकतं.

प्रोटीनयुक्त पदार्थांचं अती सेवन केल्यामुळे नेमक्या कोणत्या शारीरिक व्याधी उद्धभवतात ते आज आपण जाणून घेऊयात.

सध्या अनेक जण प्रोटीनयुक्त पदार्थ खाण्यावर भर देतांना दिसतात. मात्र, शरीरात प्रोटीनचं प्रमाण जास्त झालं तर त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो.

शरीरात प्रोटीनचं प्रमाण अती झाल्यास पोटात गॅस होणे, अपचन यांसारखा त्रास होतो.

प्रोटीनमुळे अनेकदा शरीरातील कॅल्शिअमचं प्रमाण कमी होतं. परिणामी, शरीरात हाडांसंबंधित तक्रारी निर्माण होऊ शकतात.

प्रोटीनचं अती सेवन केल्यामुळे  हृदयसंबंधित तक्रारीदेखील होऊ शकतात.

प्रोटीनमुळे शरीरात अनेक बदल होत असतात. यात खासकरुन कॅलरीज वाढल्यामुळे वजनदेखील वाढू शकतं.

प्रोटीनच्या अती प्रमाणामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते. परिणामी, डिहायट्रेशनदेखील होऊ शकतं.

बेसनाच्या पिठात किडे झाल्यास काय करावे?

Click Here