लसूण म्हणजे स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा घटक पदार्थ. लसणापासून अनेक वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात.
भाजी, आमटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या लसणाची चटणीही तितकीच चटकदार लागते. मात्र, प्रमाणापेक्षा जास्त लसूण खाल्ला तर त्याचे साईड इफेक्टसही होतात.
कच्चा लसूण खाल्ल्यामुळे लिव्हरला त्रास होण्याची शक्यता असते. जास्त लसूण खाल्ल्यामुळे लिव्हर टॉक्सिसिटी होऊन त्याचा पचनसंस्थेवर परिणाम होतो.
उपाशीपोटी लसूण खाल्ला तर अतिसार होण्याचे चान्सेस असतात. लसणामध्ये सल्फर तयार होणारे घटक असतात. त्यामुळे कच्चा लसूण खाल्ला तर अतिसाराचा ट्रिगर पॉईंट प्रेस होतो आणि लूज मोशन्स होतात.
लसूण उष्ण प्रकृतीचा आहे. त्यामुळे जास्त लसूण खाल्ल्यामुळे पोटात जळजळ, उलटी होऊ शकते.
लसूण खाल्ल्यामुळे लो ब्लड प्रेशरचा त्रास उद्भवू शकतो. ज्यामुळे चक्करदेखील येऊ शकते.
डॅशिंग दिसण्यासाठी पुरुषांनी नक्की ट्राय करा ही मेटल ज्वेलरी