नारळपाणी पिण्याअगोदर काय खबरदारी घ्यायची?
अशक्तपणा आल्यावर शरीराची झीज भरुन काढण्यासाठी कायम नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
नारळपाणी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण पितो. परंतु, हे पाणी पिण्यापूर्वी काही गोष्टींची खबरदारी घेणं गरजेचं आहे.
नारळ नेहमी थंड आणि कोरड्या जागी ठेवावा.
नारळ खरेदी करतांना त्यांचा वरील भाग नीट बघून घ्यावा. कुठेही चिर पडलेला किंवा बुरसटलेला नसावा. यामुळे नारळाच्या पाण्याची चवही बिघडते.
नारळ फोडल्यानंतर लगेच पाणी प्या. खूप वेळ पाणी तसंच ठेवल्यामुळे ते खराब होतं.
पाण्याला खराब चव किंवा वास येत असेल तर ते लगेच टाकून द्या. नारळ नासल्याची ही लक्षण आहे.