एकेकाळी ५०० रुपये महिन्याची नोकरी करणारी 'श्वेता' आज आहे कोट्यवधींची मालकिन आहे.
वयाच्या ४४ व्या वर्षीही श्वेता तिवारीचा जलवा कायम! टीव्हीची क्वीन आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय.
पिंकव्हिला रिपोर्टनुसार, श्वेताची एकूण संपत्ती ८१ कोटींहून अधिक आहे. यात अलिशान घर, गाड्यांचा समावेश आहे.
टीव्ही मालिका, चित्रपट, जाहिराती, सोशल मीडिया आणि मॉडेलिंगच्या माध्यमातून तिची खरी कमाई येते.
श्वेताने वयाच्या १२ व्या वर्षी फक्त ५०० रुपये महिना पगारावर ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली.
एकता कपूरच्या 'कसौटी जिंदगी की'ने तिला रातोरात स्टार बनवले.
'बिग बॉस ४' ची विजेती झाल्यानंतर तिची ब्रँड व्हॅल्यू आणखी वाढली.
श्र्वेताचे मुंबईत कोट्यवधींचे घर असून बीएमडब्ल्यू ७ सिरीज (१.४ कोटी) आणि ऑडी ए४ (४५ लाख) सारख्या लक्झरी गाड्यांही आहेत.
इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत! सोशल मीडिया आणि ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तिची मोठी कमाई होते.